जनी म्हणे पांडुरंगा जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥ कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥ कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद कां राहिला ॥३॥ कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥
No comments:
Post a Comment