पनचक्की औरंगाबाद
-----------–-------------------------
*संकलन व लेखन श्री धुमाळे एल. एम.*✒✒
*मराठवाड्याची राजधानी ,52 दरवाज्याचे शहर म्हणजे
औरंगाबाद हे शहर पर्यटन स्थळासाठी अत्यंत लोकप्रिय आहे . औरंगाबाद पासून जवळच असलेला दौलताबाद किल्ह्या, वेरुळ लेणी ,अजिंठा लेणी, बिबीका मकबरा ,भद्रा मारूतीचे मंदिर असलेले खुलताबाद. एकापेक्षा एक असा उत्कृष्ट ऐतिहासीक वारसा या औरंगाबाद जिल्ह्याला लाभलेला आहे त्यापैकी म्हणजे *पनचक्की* ही चक्की बाबा मुसाफिर यांनी 1774 साली गरिबांसाठी व यात्रेकरूंना मोफत जेवण मिळावे म्हणून सायफन पद्धतीचा वापर करून बनवली . पूर्वी बाबा गरीब लोकांसाठी लंगर लावत असत. ही चक्की 325 वर्षापासून न थांबता, न थकता व न दुरुस्त करता सतत चालू आहे व विजेविना फिरत आहे .
https://youtu.be/UIlzzmnEij4
पनचक्की चा विडिओ पाहण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा
▪संकलन -धुमाळे एल. एम▪
No comments:
Post a Comment